माणगावजवळ दुचाकीचा भीषण अपघातात

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगावमधील मुंबई-गोवा महामार्गावरील आडघर फाटा हॉटेल येथे मंगळवारी (दि.27) कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात शिवसेना श्रीवर्धन तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गोवारी यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास जनार्दन गोवारी (55) हे मुंबई-गोवा महामार्गावरील आडघर फाटा येथून मुंबईच्या बाजूकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागून येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात जनार्दन गोवारी यांचा मृत्यू झाला. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात कार चालक महेश सुर्वे (38) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई तळेकर करीत आहेत.

Exit mobile version