सेवालाल जयंती साजरी

| रसायनी | वार्ताहर |

श्री संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंतीनिमित्त नविन पोसरी मोहोपाडा येथील बंजारा समाजाच्या देवस्थान परिसरात विविध कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी माजी सरपंच संदिप मुंढे, राकेश खारकर, नंदकुमार कुरंगळे, गोविंद माळी, मनोहर पाटील, पांडू माळी, आकाश कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. संत सेवालाल महाराजांच्या मंदिराला आकर्षक सजविण्यात आले होते. नविन पोसरी येथून डिजेच्या तालावर रसायनी परिसरातील गोर बंजारा समाजाकडून मिरवणूक लोधिवली येथील गोर बंजारा ज्ञानपीठात काढण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंजारा समाजातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version