लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

। चिपळूण । प्रतिनिधी ।

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याच्या धक्कादायक प्रकार चिपळूणमध्ये घडला आहे. हा प्रकार एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत घडला आहे. मंदार मंगेश कदम असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मंदार कदम याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले. तसेच धमकावून तिचे अनेकदा शारीरिक शोषण केले. यामुळे ती गर्भवती झाली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संशयित मंदार कदम याला ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version