। मुंबई । प्रतिनिधी ।
चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध पती-पत्नीविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वांद्रे येथे राहत असून, तिचा पिडीत चौदा वर्षांचा मुलगा आहे. आरोपी तिच्या परिचित असून त्यांच्यात जुना वाद होता. याच वादातून तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांत तक्रार केल्याचा आरोपींच्या मनात राग होता. याच रागातून त्यांनी तिच्या चौदा वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याला घरी आणून त्याच्यावर जबदस्तीने अनैसर्गिक आणि अश्लील कृत्य करुन अत्याचार केला. त्याने विरोध केल्यानंतर त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली होती. मुलाकडून तक्रारदार महिलेला हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने जुहू पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
