अल्पवयीन मुलीवर अत्याचार

17 वर्षीय मुलाविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. जुलै 2026 मध्ये पीडित मुलगी तिच्या राहत्या घरी असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेतून मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर ती पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली असता हा प्रकार उघडकीस आला. आरोग्य केंद्रातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version