मांडवा पोलिसांनी नराधमाला केले गजाआड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची निंदनीय घटना अलिबाग तालुक्यामध्ये घडली. त्या नराधमाला मांडवा पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश पोतदार असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या दुकानात अल्पवयीन 11 वर्षाची मुलगी बुधवारी (दि.8) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास काही खाऊ आणण्यसाठी गेली होती. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिला मागच्या दरवाजातून दुकानात येण्यास सांगितले. त्यानंतर तिच्यावर त्याने अत्याचार केला. ही घटना किहीममध्ये आरोपीच्या दुकानात घडली असून, याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून गुरुवारी दुपारी अलिबागमधील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले.






