| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्याप्रकरणी वीस वर्षीय आरोपी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 28 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 17 वर्षे नऊ महिने वयाच्या पीडितेसोबत मे, जून 2026 मध्ये आरोपीने तालुक्यातील गावातील रूमवर असताना जबरदस्तीने अत्याचार केला आणि यात ती गर्भवती राहिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत. हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
