| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधातून तिच्यासोबत मंदिरात लग्न करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. कर्जत पोलिसांनी याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग केला आहे. हा तरुण पनवेलमधील करंजाडे भागात राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याने पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर पीडित मुलीसोबत मंदिरात लग्न करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने गेल्या जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत तिला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरातून ती गरोदर राहिली. गेल्या आठवड्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला. आता हा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.







