| पनवेल | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना आरोपीने तिच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि तिच्या घरी रात्रीच्या वेळी गप्पा मारण्याच्या बहाण्याने “माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी लग्र करणार आहे”, असे बोलून तिला लग्राचे आमिष दाखवले आणि तिच्यावर अत्याचार केला.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
