। मुंबई । प्रतिनिधी ।
नालासोपारा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दहा वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलगी नालासोपाऱ्यातील शिर्डीनगर परिसरात राहते. शनिवारी (दि. 02) गणेश चतुर्थीनिमित्त गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी पीडित मुलगी गेली होती. घरी परतत असताना घराच्या जवळच्या परिसरात दोन व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवले आणि तिला निर्जन स्थळी नेले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने दोघांनी लैंगिक अत्याचार केला. तिची प्रकृती ठीक नसल्याने घरच्यांना मुलीसोबत गैरप्रकार घडल्याचा संशय आला. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार आपल्या तिने पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.