हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदे गटावर नामुष्की

| हिंगोली | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीच्या हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर (शिंदे गट) आली आहे. हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांच्या नावाला स्थानिक विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली होती. या यादीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र भाजपचा दबाव होता. त्यामुळे हिंगोलीचा जाहीर उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.अधिकृत कोणतीही घोषणा न करता एकनाथ शिंदेंची शिवसेना एबी फॉर्म देण्याचं काम करत आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजने केलेल्या सर्व्हेनुसार हेमंट पाटील यांच्या नावाला विरोध होता. भाजप देखील उमेदवार बदलण्यासाठी आग्रही होते.

हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते काल आक्रमक झाले होते. वर्षा निवासस्थानी त्यांनी मोर्चा देखील काढला होता. रस्सा रोको देखील करण्यात आला. मात्र तरी देखील आज शिंदे गटाने हेमंत पाटील यांचे तिकीट रद्द केले आहे. बाबुराव कमद म्हणाले, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मुंबईला बोलावले होते. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु करा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. हेमंत पाटील यांच्याशी माझं बोलण झालं आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याची आली आहे. त्यामुळे पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version