| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
दिल्लीतील संसदेत सोमवारी (दि. 6) नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील पाच खासदारांनीदेखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा शपथविधी 10 एप्रिल रोजी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून आलेले पार्थ पवार हे 9 एप्रिल रोजी शपथ घेणार आहेत.
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
