शरद पवार पुन्हा सक्रिय

| सोलापूर | प्रतिनिधी |

निवृत्ती मागे घेतल्यानंतर शरद पवार सोलापूर दौर्‍यावर आहेत. विठ्ठल साखर कारखाण्यात त्यांनी हजेरी लावली. या कारखाण्यात बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेत कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येईल, असा दावा केला.

शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार आहे. फक्त 5 ते 7 राज्यात भाजपचे सरकार आहे. देशभरात भाजपची घसरण होत आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये आता भाजप नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये देखील भाजप नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेमुळे सरकार आले. मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते. तिथे देखील भाजपला आता संधी नाही. पवार यांनी बारसू रिफायनी प्रकल्पावर देखील भाष्य केले. पर्यावरणाला हाणी पोहचत असेत तर असे प्रकल्प नको. लोकांवर कोणतीही सक्ती नको त्यांना विश्‍वासात घ्यायला हवे, असे शरद पवार म्हणाले.

संजय राऊत राष्ट्रवादीत येणार असे नितेश राणे म्हणाले होते. यावर शरद पवार म्हणाले, कोणीतरी सिरीयस बोलत असेल तर मी उत्तर देतो. हे राणे-बिने यांच्यावर मी काय बोलावे, असे पवार म्हणाले.
अग्रलेख – पवारांची हार?

ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसं काही चुकीचं नाही. परंतु महाविकास आघाडीची याबाबत अशी काही चर्चा झालेली नाही. ते नाना पटोल यांचे व्यक्तिगत मत आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचा याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत हे मत मांडायला काही हरकत नाही.

शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष

Exit mobile version