| कोल्हापूर | प्रतिनिधी |
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी यूपीएचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मी घेणार नाही. मला त्यात अजिबात रस देखील नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. मात्र, एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे, असंही त्यांनी सुचित केले.
कोल्हापूरच्या दौर्यावर आलेल्या पवारांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हणाले की, विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत.ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे. इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही शरद पवार म्हणाले. संजय राऊतांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, त्यांचं मत हे माझं मत असं नाही.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय
यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची व्यवस्था केली आहे. ममता बॅनर्जी यांची इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र बसून विचार करावां. उद्धव ठाकरे आणि मी बैठक बोलवावी. ती बैठक मुंबईत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही इतरांशी बोललो नाही. ममतादीदींनी चांगल्या सद्भभावनेतून भूमिका मांडली आहे. अशी बैठक घ्यायची असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. आंध्रप्रदेश, तेलंगना, राजस्थान, तामिळनाडू येथील मुख्यमंत्री आदी सर्वांशी चर्चा करून एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू, असं पवार म्हणाले.
राज ठाकरे हे मोदींच्या संदर्भात काय काय भूमिका मांडत होते, ते महाराष्ट्राने पाहिलाय, आता त्यांची बदललेली भूमिका महाराष्ट्र पाहतोय. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसतं हे आपण पाहिलंय. राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत होतात आणि मग मध्येच येऊन एखादं लेक्चर देतात.असा टोमणाही त्यांनी मारला.
सध्या अधिवेशन सुरु आहे. लोकसभा, राज्यसभेत यावरुन विरोधक आक्रमकणे भूमिका मांडत असून ती मांडली जाईल. प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरायचं नसतं. लोकसभा, राज्यसभा सुरु असताना त्या व्यासपीठाचा उपयोग केला पाहिजे. तिथे काही नाही झालं तर रस्त्यावर उतरुया.
शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष