आरडीसीसी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचे होणार उद्घाटन; उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.27) संपन्न होणार आहे. हा सोहळा माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीस अवजड मंत्री अनंत गीते, आ. अबु आझमी, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खा. हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील, माजी. आ. बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या क्रार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन आरडीसीसी बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील व उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी केले आहे.