शर्मिला सत्वे यांना पितृशोक

| माणगाव | वार्ताहर |

शर्मिला शिवाजी सत्वे यांचे वडील महीपत सहदेव वाढवळ यांचे शुक्रवार (दि.26) माणगाव तालुक्यातील कळमजे गावी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 75 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुलोचना महीपत वाढवळ, मुलगा सुरेश वाढवळ, मुलगी शर्मिला शिवाजी सत्वे, मुलगी शर्मिला रामदास वारिक, गुलाब अनिल बक्कम, मुलगी प्रमिला योगेश वाघरे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाढवळ, सत्वे, वारिक, बक्कम, वाघरे कुटुंबियांवर व कळमजे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. यांचा दशक्रिया विधी रविवार (दि.4) फेब्रुवारी रोजी तर उत्तरकार्य विधी (बारावे) मंगळवार (दि. 6) फेब्रुवारी कळमजे येथे होणार असल्याचे सुरेश वाढवळ यांनी सांगितले.

Exit mobile version