। पनवेल । प्रतिनिधी ।
मला वाटलं ही सभा अलिबागला होईल, पण ही सभा खांदा कॉलनीमध्ये होत आहे. या नावाचासुद्धा योगायोग आहे. आजची ही सभा एका नव्या जोमाने आणि स्फूर्तीने उभी राहील. कार्यकर्त्यांना उर्जा देणारी ठरेल, आणि या महायुतील खांदा दिल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प आज आपण करुन पुढे जाऊया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचा हा वर्धापन दिन सोहळा निष्ठेचा आणि निष्ठावंतांचा, याचा मला अभिमान आहे, कारण व्यासपीठावर असणारे आम्ही सर्व निष्ठावंत असून, सत्तेच्या पाठीमागे न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय.
महायुतीला ‘खांदा’ दिल्याशिवाय राहणार नाही; शशिकांत शिंदेचा निर्धार
