विभागीय पोलीस निरिक्षकांकडे गार्हाणे
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर थांड मांडून बसलेले असतात. यामुळे काही जनावरे आपघाताला सामोरे जातात तर काही जनवरांच्यामुळे आपघात घडून वाहन चालक व प्रवासी जखमी होत असतात. यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ या समस्येबाबत आक्रमक झाले होते.
दिवसेंदिवस मोकाट गुरांच्यात होत असलेली वाढ, याचबरोबर वाढते आपघात तसेच ही गुरे रात्री-अपरात्री कुठेही उभी असतात. यामुळे काही गुरांना अवजड वाहनांच्या धडकेने अपघात होऊन जखमी होतात तर काही जागीच मृत्यू पावत असल्याच्या घटना घडत आहेत. काहीवेळा दुचाकीस्वार यांना धडक बसल्याने ते देखिल जखमी होत आहेत. या मोकाट गुरांचे मालक कोण आहेत, याचा थानपत्ता नाही. परंतु, यातच मार्गाचे रुंदीकणाचे काम सुरू असून यात राष्ट्रिय महामार्ग म्हणून वाहतुकीचे प्रमाण देखिल अधिक असल्याने यावर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी यावेळी कोलाड पोलिस प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामजिक संघटना पत्रकार यांनी शनिवारी (दि.28) विभागीय पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांची भेट घेऊन सार्या समस्यांचे गार्हाणे मांडत यावर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे रोहा तालुका उपप्रमुख चंद्रकांत लोखंडे, प्रफुल बेटकर, विष्णू महाबळे, विजय शिंदे, महेश जंगम, श्याम लोखंडे, विश्वास निकम, तेजपाल जैन, परदेशीसह कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ, विविध संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.