शीना बोरा जिवंत; इंद्राणी मुखर्जीचे सीबीआयला पत्र

मुंबई । वृत्तसंस्था ।
शिना बोरा हत्याकांडात नवा ट्विस्ट आलाय. शिना बोरा हत्याकांडप्रकरणील महत्त्वाचं नाव असलेल्या इंद्राणी मुखर्जीने पत्र लिहून शिना बोरा जिवंत असल्याचा दावा केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शीना जिवंत असून ती काश्मीरमध्ये आहे, असा दावा इंद्राणीनं केलाय. इंद्राणी मुखर्जीनं सीबीआय संचालकांना पत्र लिहून हा दावा केलाय.
सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की, नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले, जिने तिला सांगितले की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्याला अशी मागणी इंद्राणीने केली आहे. मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे.इंद्राणीने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते.एप्रिल 2012 मध्ये, नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

Exit mobile version