शेकाप कार्यकर्ते ग.वि. गावंड गुरुजी यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।
पिरकोन येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते गजानन विठ्ठल गावंड गरूजी यांचे गुरुवार, दि. 13 जानेवारी रोजी वयाच्या 79 वर्षी निधन झाले. पिरकोनमध्ये शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांभाळली त्यामध्ये ग.वि. गावंड गुरुजी यांचा उल्लेख केला जातो. रायगड जिल्ह्यात कर्जत, सुधागड, पाली, उरण, भेंडखळ येथे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विविध नाटकांमध्ये काम केले आहे. माजी जि.प. सदस्य जीवन गावंड, पिरकोन सरपंच रमाकांत जोशी, शहर चिटणीस शेखर पाटील यांनी त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे. त्यांचे दहावे शनिवारी 22 तारखेला, तर दिवसकार्य रविवारी 23 तारखेला पिरकोन येथे होणार आहे.

Exit mobile version