। उरण । वार्ताहर ।
पिरकोन गावातील मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली होती. यामुळे आवरे, गोवठने, पाले व उरण पूर्व विभागातील येणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सतत सहा महिने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, सांगले व खोपटे गावातील देवेंद्र पाटील यांनी स्वतः पाहणी करुन खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले.
सध्या पावसामुळे तात्पुरत्या स्वरुपात काम केले. पाऊस थांबल्यावर लवकरच पाईप टाकून कायमस्वरूपी काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याकामी गोवठने गावातील भारत पाटील, अॅड. जीत, विद्यानंद, स्वामी गावंड, माजी सरपंच कमलाकर गावंड, काशीनाथ गावंड, आवरे गावातील रत्नाकर म्हात्रे, दीपक पाटील, विलास गावंड, जीवन गावंड, मुकुंद गावंड यांनी मेहनत घेतली.