मुळेमध्ये शेकाप,काँग्रेस आघाडीचा प्रचार

। खारेपाट । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील मुळे ग्रामपंचायतीच्या शेकाप, काँग्रेस आघाडीचा प्रचाराचा प्रारंभ सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी शंकराच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, काँग्रेस नेते रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, ज्येष्ठ नेते काका ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुनील थळे, समीर ठाकूर, उमेश ठाकूर, युवा नेते पिंट्या ठाकूर, आकाश राणे, सुजय घरत, राकेश पाटील, शैलेश घरत, प्रमोद पाटील, शेकाप पदाधिकारी विक्रांत वार्डे, अजित माळी, सतीश म्हात्रे, तसेच शेकाप व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडणुकीत शेकाप व काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार (स्व. मधुकर ठाकूर पॅनलच्या) थेट सरपंचपदाच्या उमेदवार सुहानी पाटील उभ्या आहेत.

प्रभाग क्र. 1 -सदानंद पाटील, निलेश घरत
प्रभाग 2 – प्रसाद थळे, श्रृती थळे
प्रभाग 3- रमेश पाटील, अश्‍विनी पाटील

मुळे ग्रामपंचायत परिसरातील जनतेचा विकास शेकापने केला आहे. यापुढे सर्वांगीण विकास होण्यासाठी आघाडीचे उमेदवार निवडून द्यावेत.

चित्रलेखा पाटील
शेकाप नेत्या

शेकाप काँग्रेस आघाडी कुठल्याही स्वार्थासाठी केलेली नाही. तरी येथील जनतेला विकास व्हावा हेच आमचे ध्येय आहे.

राजाभाऊ ठाकूर
काँग्रेस नेते
Exit mobile version