विक्रम-मिनीडोअर संघटनेसाठी शेकाप, शिवसेना एकवटले

पेण पालिकेवर 13 फेब्रुवारीला मोर्चा

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्याची जीवनवाहिनी समजली जाणार्‍या विक्रम-मिनीडोअर चालक मालक संघटनेवर पेण नगरपालिकेने बेकायदेशीर रित्या जो अन्याय चालवला आहे, त्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते (ठाकरे) विष्णू पाटील यांनी मंंगळवारी (दि.31) दिला आहे. विक्रम मिनीडोअर थांब्यामधील एक इंचही जागा ही आपण घेऊ देणार नाही. या विरोधात 13 फेब्रुवारील नगरपालिकेवर कौटुंबिक मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी शेकाप, शिवसेनेच्यावतीने घेण्यात आला. पेण येथे बापदेव देवस्थानमध्ये बाप देव देवस्थान येथे विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला मार्गदर्शन करताना विष्णू पाटील यांनी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील पाचशे तरूण आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह या विक्रम मिनीडोअर वर करत आहेत. परंतु स्थानिक आमदारांनी भूमिपुत्रांना लागणार्‍या सर्व सुविधा पुरवणे गरजेचे आहे. परंतु असे न करता जर या तरुणांवर अन्यायकारक निर्णय लादत असणार तर ते मान्य नाही, असेही त्यांनी सांगितले. हा तर 1997 पासून चा स्थळ आहे. त्यामुळे या विक्रम मिनीडोअर थांब्यातून 1 इंच जागा ही आपण घेउ देणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रेमाने बोलले तर लंगोटी देऊ, दादागिरी केली तर तुमची उखडून काढू, या शब्दात नगरपालिका प्रशासनाला खडसावले. आज विक्रम मिनीडोअर चालक मालकांनी एक गोष्ट लक्षात घ्या जे तुम्हाला हकलायला निघालेत त्यांचाच तुम्ही सत्कार करताय हारतुरे देताय ही बाब योग्य नाही. असे ते म्हणाले.

1998 पासून आपण या जागेसाठी लढा दिलेला आहे आणि दरवेळेला आपण आपला हक्क अबादित राखलेला आहे त्यामुळे सर्व विक्रम मिनीडोअर चालकांनी निर्धास्त रहा, सर्तक रहा, गाफील राहू नका. हा लढा आपण एकजुटीने लढायचा आहे. जे जे विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेला विरोध करतील त्यांना त्यांना त्यांची जागा येणार्‍या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.

विष्णू पाटील,शिवसेना नेते

या सभेला मार्गदर्शन करताना नगरसेवक संतोष पाटील यांनी तांत्रिक बाबी काय आहेत. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विक्रम मिनीडोअर थांबा आहे त्याच ठिकाणी कसे ठेवता येईल. हे ही आपल्या भाषणात सांगितले. शोमेर पेणकर यांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कशाप्रकारे ठराव बदलले जातात. याबाबत सांगून नगरपालिकेत विक्रम मिनीडोअर चालक मालक यांच्या बाजूने ठराव घेतले असताना घाबरण्याची गरज नाही आपण एकजूटीने हा लढा देऊ आज आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. निकराने लढा देऊ आणि जिंकूही असे जाहीर केले.

शेकापचे युवा नेते मंगेश दळवी यांनी आमचा हक्क कोणी हिसकावत असेल तर, आम्ही आपल्याला सोडणार नाहीत. कारण आज आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न आहे. आमचे कुटुंब या विक्रम मिनीडोअर व्यवसायामुळेच उपजिवीका करत आहेत. त्यामुळे लढा देऊआणि जिंकूच असा ठाम विश्‍वास विक्रम मिनीडोअर चालकांना दिला.

नरेश गावंड यांनी नगरपालिका प्रशासनाला दम देत सांगितले की, विक्रम मिनीडोअर चालक हे स्थानिक भूमिपुत्र आहेत, हे भैय्ये नाहीत त्यांच्यावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही. न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही तयार आहोत. पेण तालुका विक्रम मिनीडोअर चालक संघटनेचे अध्यक्ष देवानंद पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषण करून कशाप्रकारचा अन्याय विक्रम मिनीडोअर चालकांवर होत आहे याचा पाढाच वाचला. या सभेसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्यासह विक्रम मिनीडोअर चालकांचे हितचिंतक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.

साद घालणार गाव पुढार्‍यांना
13 फेब्रुवारी शेकाप आणि शिवसेनेच्या माध्यमातून पेण नगरपालिकेच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी विक्रम मिनीडोअर चालक आपापल्या गाव पुढार्‍यांना विनंती करणार आहेत की, आजपर्यंत तुमच्या मोर्चांना सभांना आम्ही आपली माणसे पोहोच केली. मात्र, आज आमच्या जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्याला तुम्ही हजर राहावे, आणि त्यांच्या या विनंतीला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version