बीड जिल्ह्यात शेकापचा वर्धापनदिन उत्साहात

। बीड । प्रतिनिधी ।
3 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिन व क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील, लोकशाहीर साहित्यरत्न क अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम तेलगाव येथे मानवी हक्क अभियानाच्या सभागृहात घेण्यात आला. शेकाप ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव, कॉम्रेड काशीनाथ कापसे, माजी सभापती संभाजी शिनगारे, गयाबाई आवाड, अ‍ॅड. अनिकेत देशमुख, गणपतराव कोळपे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात शेकाप वर्धापनदिनाचा ध्वज मोहन गुंड यांच्या हस्ते फडकावत झाली, उपस्थित सर्वांना बाबुराव जाधव व कॉम्रेड काशिनाथ कापसे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, शेवटी शेकापची प्रतिज्ञा सर्वांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार आयोजक अ‍ॅड नारायण गोले पाटील यांनी केले.

यावेळी शेकाप नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुमंत अण्णा उंबरे, संभाजी चव्हाण यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अशोक रोडे, दत्ता प्रभाळे, मुंजा पांचाळ, सुमंत अण्णा उंबरे, सिताराम बडे, अमोल सावंत, नवनाथ जाधव, अनिल कदम, बाळासाहेब तरकसे, बलभीम भगत, माऊली जाधव, महेश गायकवाड,, बाबाराजे गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version