प्रश्‍न सोडविण्यात शेकाप आघाडीवर- सचीन ताडफले

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्याच्या विकासाकडे येथील थापेबाज आमदाराचे दुर्लक्ष झाल्यामुळे तालुका विकासाच्या प्रक्रियेतून 10 वर्ष मागे गेला आहे. या तालुक्याला विकासाच्या प्रक्रियेत आणून तालुक्याचा विकास साधण्याची ताकद फक्त प्रीतम म्हात्रे याच्यांमध्येच आहे, असा ठाम विश्‍वास सचीन ताडफले यांनी पुनाडे ग्रामस्थांसमोर बोलताना व्यक्त केला आहे.

उरण विधानसभेचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारानिमीत्त पूनाडे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना सचीन ताडफले म्हणाले की, उरण तालुक्याचा विकास केवळ मा.आ. विवेक पाटील यांनीच केला आहे. नंतरच्या काळात आलेल्या आमदारांनी लोकांच्या गरजांकडे व विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. शेकापकडे कुठलीच सत्ता नसली तरी शेकापची नाळ सर्वसामान्य जनतेशी असल्याने जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात शेकाप आघाडीवर असतो. महायुतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये काम करण्याची उर्जा राहिलेली नाही, त्यांना घरी बसवून तरूण नेता प्रीतम म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version