गोरगरीबांचे प्रश्न मांडणारा प्रबळ पक्ष: अतुल म्हात्रे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता अढळ आहे. पक्षाबरोबर तो कायम आहे, हे आजच्या मेळाव्यातील गर्दीने दाखवून दिले आहे. कामगार, गोरगरीबांचे प्रश्न मांडणारा प्रबळ पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी केले.

रायगडमध्ये तिसरी मुंबई येऊ घातली आहे. वेगवेगळे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे गोरगरीबांसाठी भुमीपुत्रांसाठी काम करण्याची संधी पक्षाला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची भुमिका घेतली जाणार आहे. भूमीपुत्रांवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी काम केले जाणार आहे. रोजगार, पर्यावरण, शिक्षण या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. आगामी काळात शहरीकरण वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा निर्णय घेणे आवश्यक आहे. उत्तर रायगडमध्ये पनवेल, कर्जत उरण तसेच दक्षिण रायगडमध्ये अनेक प्रकल्प आले आहेत. विकास नियमावलीचा विकास आराखड्याचा भूमीपूत्रांवर होणाऱ्या परिणामामुळे शेकापचे महत्व अधिक प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन अतुल म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version