सांबरी येथील रस्त्याचे भूमीपूजन
| शिहू | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्ष विकासाला कधीच विरोध करत नाही. या भागातील नागरिकांचे आमच्यावर असलेले प्रेम यामुळे आचारसंहितेला काही अवधी असताना या कामाच्या भूमीपूजनाचे नारळ फोडण्याचे योग आले आणि यापुढे या विभागातील सर्व विकासकामांचे नारळ शेतकरी कामगार पक्षाचा आमदारच फोडेल, अशी ग्वाही यावेळी शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी दिली.
कुर्डुस ग्रामपंचायत हद्दीतील सांबरी येथील रहदारीचा रस्ता गेली अनेक वर्षे रखडलेला होता. माजी सरपंच संदीप पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने अखेर रस्ता व मंदिरासाठी 40 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिलेल्या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पंडित पाटील बोलत होते. या कामाचे भूमीपूजन शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पंडित पाटील यांच्या पाठपुराव्याने या कामाचे शुभारंभ झाले आहे. या विभागावर शेतकरी कामगार पक्षाचे विशेष प्रेम असून, ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला आमदारकी नसतानाही भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मला संधी मिळाली, असे पंडित पाटील म्हणाले.
यावेळी शेकाप रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, युवा नेते सवाई पाटील, सारिका पाटील, कुर्डूस ग्रामपंचायत माजी सरपंच संदीप पाटील, राम कर्वे, सुनील पिंगळे, रवींद्र पिंगळे, कांचन केणी, मुरलीधर पाटील, धर्मदास पाटील, मधुकर घरत, नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील, तुकाराम पाटील, अशोक डाऊर, संतोष पिंगळे, सुनील म्हात्रे, कुमार पाटील, मछिंद्र पाटील, त्रंबक पाटील, संतोष पाटील, कलेंद्र पाटील, प्रशांत पिंगळे, अमोल पाटील, ओमकार पिंगळे, तुकाराम पिंगळे, अरविंद पाटील, नयन बांधनकर, हिराचंद नाईक, संदीप नाईक, चंद्रकांत नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.