| पनवेल | वार्ताहर |
खांदा कॉलनीच्या सुरळीत पाणीपुरवठयासाठी रहिवासी महिला आक्रमक झाले असून माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांची सिडको कार्यालवर धडक मोर्चा दिला. यावेळी शेकापक्षाने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सिडको कार्यालया बाहेर धुनी भांडी करण्याचा इशारा दिल्याबरोबर सिडकोतर्फे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.
खांदा कॉलनी मध्ये गेल्या आठवड्याभरापासून पाणी कपात व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तसेच सिडको पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठ्याचे शटडाऊन च्या नावाखाली खांदा कॉलनी करांवर अन्याय सुरू होता. खांदा कॉलनी मधील नागरिकांची गैरसोय गेल्या त्रस्त संतप्त नागरिकांनी पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शेकाप नेते गणेश पाटील तसेच कामगार नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महापालिका क्षेत्राचे कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभाग सिडको कार्यालय नविन पनवेल येथे खांदा कॉलनीतील नागरिकांचा घेऊन सिडकोला कार्यालवर धडक दिली. यावेळी रहिवासी महिला पाणी कपातीवर अतिशय आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शेतकरी कामगार पक्षातर्फे पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर उद्या आम्ही पुन्हा येणार आणि सिडको कार्यालया बाहेर धुनी भांडी करू असा इशारा महिलांनी दिला.
पाणी कपातीविरोधात शेकापचे आंदोलन
