शेकापचा जैन समाजाला पाठिंबा- आ.जयंत पाटील

अलिबागेत 12 जानेवारीला मोर्चा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

तीर्थक्षेत्र समेतशिखरज पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या विरोधात संपूर्ण रायगड जैन समाजातर्फे दि. 12 मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मंगळवार (दि. 3) रोजी संपूर्ण रायगड जिल्हा जैन समाज च्या 27 गावातील विश्‍वस्त मंडळाची ची मीटिंग अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती.

या सभेत झारखंड मधिल जैन समाजाचे प्रसिद्ध व पूजनीय तीर्थ शे त्र समेतशिखरज ला सरकार ने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्याच्या विरोधात 12 जानेवारीला रायगड जैन समाज मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय रायगड जैन संघ व कच्छी जैन संघ यांनी ठराव एकमतानी मंजूर केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बहूसंख्यने जैन समाज अलिबागला येणार आहे. यावेऴी जिल्ह्यातील जैन समाजाचे सर्व दुकान ऑफिसेस बंद राहतील. या मोर्चाला तसेच जैन समाजाच्या मागणीला शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती नगरसेवक अनिल चोपडा यांनी दिली.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी अलिबागमधील कच्छी भवन येथे मंगळवारी जैन समाजाच्या ट्रस्टी आणि अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी 20 गावातील ट्रस्टी आणि अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी समाजाच्यावतीने अलिबाग येथे 12 जानेवारीला कच्छी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या मोर्चात जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेले विरागसागर महाराज आवर्जून सहभागी होणार असल्याची माहिती चोपडा यांनी दिली.

जैन समाजाची मागणी रास्त
दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी जैन समाजाची मागणी रास्त असून, सरकारने या मागणीचा फेरविचार करावा असे म्हटले आहे. जैन समाजाला शेकापचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या समेद शिखरजीवरून वाद आणखी वाढला आहे. समेद शिखरजीचा काही भाग वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केल्याबद्दल आणि झारखंड सरकारने धर्मबाह्य कामांसाठी अधिसूचना जारी केली आहे.. या अधिसूचनेच्या विरोधात भारतात विविध ठिकाणी जैन समाजाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत.

समेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास जैन समाजातील लोकांचा विरोध आहे. समेद शिखरजी हे आपले पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगून जैन समाजातील लोक विरोध करत असून ते जतन करण्याची मागणी करत आहेत. समेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या निर्णयाला विरोध करणारे लोक याला त्यांच्या धार्मिक श्रद्धेवरचा हल्ला म्हणत आहेत.

जैन धर्माच्या लोकांचे म्हणणे आहे की, याद्वारे लोक पवित्र स्थळी आध्यात्मिकरित्या नव्हे तर आनंदाच्या भावनेने जातील. केंद्र आणि राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. समेद शिखरजी यांच्या विरोधात देशभरात होत असलेल्या निषेधाचे मूळ केंद्र आणि झारखंड सरकारने नुकतीच जारी केलेली नोटीस आहे. केंद्र आणि झारखंड सरकारने जारी केलेल्या नोटीसमध्ये सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ बनवण्याचे म्हटले आहे. जैन समाजातील लोकांनी सरकारकडून जारी केलेल्या नोटिशीला त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्याविरोधात मोर्चा उघडला.

या विरोधात 12 जानेवारीला संपूर्ण रायगड जैन समाज मोर्चा काढून जिल्हाधिकारी रायगड, व भारत सरकार ला निवेदेन देणार आहेत. या दिवशी पूर्ण रायगड जिल्हयातील जैन समाजाचे सर्व दुकान ऑफिसेस बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version