शेवंती भोईर यांचे निधन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावच्या रहिवासी शेवंती शिवराम भोईर यांचे शनिवारी (दि.28) वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्या 78 वर्षांच्या होत्या. अतिशय प्रेमळ व सर्वांशी मिळून मिसळून राहणार्‍या शेवंती भोईर या आपल्या कुंटूबातील तसेच सार्वजनिक कामात देखील नेहमी अग्रेसर असायच्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा गोतावळा असून त्यांचे दशक्रियाविधी सोमवारी (दि.6) तर अंतिम धार्मिकविधी गुरुवारी (दि.9) देवकान्हे येथील घरी होणार आहे.

Exit mobile version