| शिहू | वार्ताहर |
माध्यमिक शाळा शिहू येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण संमारंभ उत्सहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माध्यमिक शाळा शिहू सभापती डॉ. रोहिदास शेळके यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदीप पोमण होते. या स्नेहसंमेळनानिमित्त विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य, समाजप्रभोधनपर गीते, हास्यविनोद या अदाकारीने मान्यवारांसह प्रेक्षकांचे मन जिंकले. या वेळी पेण पंचायत समिती माजी सभापती मनीषा भोईर, संजय भोईर, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम, डॉ. कांचन शेळके, उपाध्यक्ष के. के. कुथे, कार्याध्यक्ष पांडुरंग गदमले, संचालक जीवन शेळके, बाळाराम पाटील, वेट्या खाडे, सावित्री शेळके, मधुकर पारधी, तन्मय कुथे, वेदश्री भोईर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका स्नेहांकिता म्हात्रे यांनी केले.