| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबरला होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार चाचपणीला वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर यावेळी पहावयास मिळणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे) अशी महाविकास आघाडी असून त्यांचे विरुद्ध शिंदे गटाची बाळासाहेबांची शिवसेना गट अशी सरळ लढत माणगाव लालुक्यात विविध ठिकाणी होणार आहे. शेतकरी कामगार पक्षही आपले उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत. 19 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर :- अर्ज भरण्याचा कालावधी
5 डिसेंबर :- प्राप्त अर्जांची छाननी
7 डिसेंबर :- अर्ज माघारीचा अखेरचा दिवस
18 डिसेंबर :- मतदान
20 डिसेंबर :- मतमोजणी
जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माणगाव तालुक्यातील भागाड, साई, चिंचवली, न्हावे, मुठवली तर्फे तळे, शिरवली तर्फे निजामपूर, करंबेळी, डोंगरोली, गोरेगाव, होडगाव, कुमशेत, दहिवली कोंड, मांगरूळ, पहेल, हरकोल, नांदवी, पळसप, कुंभे, टोळखुर्द या 19 ग्रामपंचायतीचा समावेश असून या ग्रामपंचायती महत्वाच्या असून सर्वच पक्षाचे नेते या ग्रामपंचायती वरील वर्चस्वासाठी व्युव्हरचना करीत आहेत.