। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वासरे परिसरातून वाहणार्या उल्हास नदीवर शिरसे आणि आवळस ही गावे जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. 2023 मध्ये उल्हास नदीवर शिरसे गावाच्या बाहेर पुलाचे बांधकाम सुरु झाले असून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलामुळे पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाणे अधिक सोपे आणि जवळचे ठरणार आहे.
उल्हास नदी हि ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते. या नदीवर शिरसे गावाजवळ पूल बांधान्यता यावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. शिरसे गावाच्या पलीकडे आवळस, नेवाळी अशी गावे असून तेथून जाणारा रस्ता हा पुढे कर्जत-खोपोली रेल्वे मार्गवरील पळसदरी येथे जातो. त्यामुळे शिरसे येथे पूल झाल्यास आकूरलेपासूनच्या नोकरदारांना तसेच विद्यार्थ्यांना कर्जत स्थानकात जाऊन उपनगरीय लोकल पकडण्याासाठी जाण्याची गरज भासणार नाही.
शिरसे पुलाचे काम अंतिम टप्प्यात
