गोखले महाविद्यालयात शिवजन्मोत्सव

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन आराठी येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. नवज्योत जावळेकर यांनी शिवस्तुती गायन करुन सर्वाना मंत्र मुग्ध केले. या कार्यक्रमास कनिष्ठ व वरीष्ठ महाविदयालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग, आणि राष्ट्रीय सेेवा योजनेचे विद्यार्थी-स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version