भिवगड किल्ल्यावरुन शिवज्योत
| नेरळ | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराज प्रतिष्ठानतर्फे किल्ले भिवगड येथून शिवज्योत कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आणण्यात आली.
गेली आठ वर्षे या प्रतिष्ठान कडून अनेक सार्वजनिक आणि सामजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गौरकामत परिसरात असलेल्या किल्ले भिवगड येथील शिव ज्योत बाईक रॅली सह आणली. सकाळी कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून शिवज्योत प्रज्वलित करून बाईकवर स्वार होऊन शिवप्रेमी निघाले. शिवराज प्रतिष्ठानचे प्रतीक ठाकरे, विकी गुरव, सचिन भोईर, जगदीश गुटे,सचिन लांगी, ऋषी बोराडे, अजय डेरवणकर, प्रियंका भासे, रुचिता कडू, स्नेहल चव्हाण, चित्रा भोईर, रोशन पवार, अजित पवार, संकेत ठाकरे, आकाश बघे, सौरव घुमरे आदींसह अनेक तरुण सहभागी झाले होते. तेथून भगवे ध्वज फडकवित हे शिवप्रेमी तरुण दुपारी बारा वाजता कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचले. या ठिकाणी कर्जत नगरपरिषदेच्या पदाधिकारी तसेच स्थानिक शिवप्रेमी नागरिक यांनी या शिवज्योतीचे स्वागत केले.
नेरळमध्ये शिवजन्मोत्सव
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळमध्ये शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामपंचायत कडून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पदाधिकारी संतोष सारंग, राहुल भाटकर, बंटी शिर्के, यतीन यादव, प्रतीक गुप्ता, श्याम कडव, प्रीतम गोरी, दादा ठाकरे, सुमित शिरसागर, प्रमोद कराळे, विजय धुळे यांनी अभिवादन केले. नेरळ ग्रामपंचायत वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, श्रद्धा कराळे, जयश्री मानकामे यांनी शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यावेळी सुरेश गोमारे, सुधाकर देसाई बंडू क्षीरसागर यांनी देखील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
कोएसो पोयनाड संकुलात जयघोष
| पेझारी | वार्ताहर |
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पोयनाड येथील ना. ना. पाटील संकुलामध्ये उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रथम चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलरंगाने साकार केलेल्या भव्य, आकर्षक शिवाजी महाराजांचे चित्रास मुख्याध्यापिका सौ ललिता पाटील यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संतोश्वरी मठपरती, संगीता माने, तृप्ती पिळवणकर, उदय पाटील, संकुलातील सर्व सेवक, एनसीसी, ढोल ताशा पथक आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी शिवप्रतिमेस अभिवादन केले.
संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने मनिश्चयाचा हामेरू हे श्लोक पठण केल आणि राज्यगीत म्हणून मान्यता पावलेले महाराष्ट्र गीत सादर केले. पुढे शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा बालशिवप्रेमींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. यामध्ये बारिया प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यम आणि ना.ना.पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी भाषणे सादर केली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. उदय पाटील यांनी आभार मानले.
बोकडविरा येथे शिवजयंती
| उरण | वार्ताहर |
बोकडविरा येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बोकडविरा-उरणच्या माध्यमातून शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवपूजन, ढोल ताशा पथकाचे वादन, बाईक रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बोकडविरा उरणचे पदाधिकारी सदस्य बोकडविराचे ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे पहिल्यांदाच शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले गेले.या सोहळ्याला जनतेचाही उत्तम प्रतिसाद लाभला.
म्हसळा नगरपंचायतीचे अभिवादन
| म्हसळा | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव नगर पंचायत कर्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, गट नेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, नगरसेविका राखी करंबे, सरोज म्हशिलकर, संजय दिवेकर, करण गायकवाड यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन व पुषहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी नगर पंचायत अधिकारी अशोक सुतार, संतोष कुडेकर, सचिन मोरे, श्री बोरकर, श्री पोकळे, अमजद साने, श्रीमती मोरे, श्रीमती जाधव आदी मान्यवर कर्मचारी उपस्थित होते.