माथेरानमध्ये शिवसैनिकांचे राजीनामे

माथेरान । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आत्ता माथेरान शहरात सुद्धा दिसू लागले आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांना त्यांच्या पदावरून काढताच माथेरानमधील शिवसैनिक पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना आणि शिवसेनेत दोन गट तयार झालेले असताना.येथील माथेरानमधील शिवसैनिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.यामध्ये शिवसेने सोबत राहायचे की बंडखोर आ. थोरवे यांच्या सोबत राहायचे या संभ्रमात माथेरान मधील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी मंडळी सापडली आहेत. एका बाजूला आ. थोरवे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेचे अधिक नुकसान होऊ नये याकडे काही शिवसैनिक लक्ष देत आहेत.

प्रमोद नायक, संगीता जांभळे,गौरांग वाघेला,निखिल शिंदे,अनिकेत जाधव, चैतन्य शिंदे,निनाद तोरणे,खालिद शेख,युवती उपाधिकारी अंकिता तोरणे, निधी जाधव संदिप शिंदे, ज्ञानेश्‍वर बागडे, अकबर मुजावर, अल्ताफ शेख, वसंत कदम, उमेश कदम, रवी बिरामणे, रामा आखाडे, लहू आखाडे, सचिन काळे, शलाका शेलार, अर्चना बिरामणे, सुहासिनी शिंदे आणि माथेरान मधील असंख्य शिवसैनिकांनी आपले राजीनामे दिले आहेत.

Exit mobile version