अनेकांना पदांची लॉटरी
। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमधील राजकीय चढाओढ याचा परिणाम कर्जत विधानसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवर शिवसैनिक यांच्यात या गटात की त्या गट अशी चढाओढ लागली आहे. त्यात अनेकांना दोन गट निर्माण झाल्याने विशेष पदे मिळू लागली आहेत आणि त्यामुळे त्या पदांची किमती नक्की किती शिवसैनिक यांच्यासाठी असेल यावर राजकीय खळ सुरु आहे. पण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात कार्यकर्ते थोरवे यांच्यासोबाबत जास्त असल्याचे दिसून येत असून विद्यमान आमदार यांचा गट सध्या तरी मजबूत दिसत आहे.
सध्या शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून पदाधिकारी असलेले देखील महेंद्र थोरवे यांची साथ प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी देतील अशी राजकीय परिस्थिती आमदार थोरवे यांनी निर्माण केली आहे आणि हे देखील कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील नेते कर्जत मधून नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करणार असतील तरी ते कार्यकर्त्ते आपल्या पदांना किती न्याय देणार हे येणार काळ ठरविणार? पण नवीन तीन वर्षे थोरवे यांचे समर्थक बनलेली हे शिवसैनिक आपल्या पडला न्याय देणार? यावर सेनेची उभारी अवलंबून आहे.
दुसरीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आणि कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक या शिवसेनेची खरी कसोटी पाहणार्या आहेत. कारण थोरवे यांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत आणि शिवसेनेतील ते सर्व इच्छुक आज महेंद्र थोरवे समर्थक म्हणून त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या खर्चिक बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेला उमेदवार शोधण्यापासून कसरत करावी लागणार आहे.त्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम हा महत्वाचा भाग असणार आहे आणि यावेळी शिवसेना महाविकास आघाडी म्हणून लढणार कि काय हे देखील गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिवसेनेची गाडी सध्या तरी हेलकावे खात पुढे चाललंय आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लक्षात घेऊन आणि आमदार थोरवे हे सर्व प्रतीक्षा पणाला लावून निवडणूक सामोरे जातात हि त्यांची रणनीती असल्याने त्यांच्या गटात निवडणूक वाढविणारे इच्छुक उमेदवार अधिक आहेत हे देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे नवीन पदाधिकारी यांच्या निवडी शिवसेनेला किती उभारी देणार हे सध्यातरी गुलदस्त्यात विषय आहे.