शिवसमर्थ पॅनलचा पागोटेमध्ये प्रचार

| उरण | वार्ताहर |
पागोटेमध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीच्या वतीने श्रीगणेश हनुमान मंदिर पागोटे येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. यानिमित्ताने प्रत्येक वार्डमधून उमेदवारांनी प्रचार केला. सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार कुणाल अरुण पाटील यांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.गावामध्ये विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.मी कोणावरही वयक्तिक टीका करणार नाही. मात्र निवडून आल्यानंतर मी गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करेन. गावचा चेहरा बदलेन, वयाने मी लहान असलो तरी कामांच्या माध्यमातून मी माझी उंची दाखवण्याचा प्रयत्न करेन.मला एक संधी द्या. असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version