शिवसेना नेते संजय जांभळे यांना अलिबाग, पेण तालुका बंदी

जेएसडब्ल्यू मधील वाद अंगलट
पेण | वार्ताहर |
डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये केलेला वाद शिवसेनेचे तालुक्यातील नेते संजय जांभळे यांच्या अंगलट आला आहे. वडखळ पोलिस ठाण्यात त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदयासह शांतता भंग करणे, दमदाटी करणे अशा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जामीनावर मुक्तता करतानाच न्यायालयाने त्यांना अलिबाग, पेण तालुका बंदी घातली आहे.
न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यत जांभळे यांना तालुकाबंदी कायम आहे, या प्रकरणातील साक्षीदार सुनीता बडा या आदिवासी समाजातील असतानाही त्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने सुरक्षा अधिकारी अरूण नायगम यांनी तक्रार दाखल केली होती. याच कारणामुळे त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version