पालीतर्फे कोतवाल खलाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पराभव

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतमध्ये रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत दोन जागेसाठी मतदान घेण्यात आले होते. त्या पोटनिवडणुकीत मतदान झालेली जागेवर शिवसेना शिंदे गटांचे उमेदवार यांना पराभवाचा झटका बसला. पाली तर्फे कोतवाल खलाटीमध्ये प्रभाग एक मधील सर्वसाधारण जागेसाठी आशिष देशमुख विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून मयूर देशमुख अशी थेट लढत झाली. कर्जत परिवर्तन आघाडीचे आशिष देशमुख यांनी मोठा विजय मिळवला. महिला सर्वसाधारण जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.त्यात परिवर्तन विकास आघाडी कडून स्नेहा देशमुख 244 मते मिळवून निवडून आल्या.

Exit mobile version