50 पेक्षा अधिक कंपन्यांचा असणार सहभाग
| खोपोली | प्रतिनिधी |
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असली तरी या मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी वणवण भटकावे लागत आहे, त्यातच अनेक तरुण-तरुणी बेरोजगारीचा सामना करीत असताना मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून 3 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन कर्जतमधील रॉयल गार्डन, मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 2 वाजेपर्यंतच्या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित 50 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असणार असल्याने या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे, त्याचबरोबर विविध नामांकित कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या रोजगार मेळाव्यात कर्जत, खालापूर विधानसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवा तसेच अधिक माहितीसाठी 8421521011/9102182183 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन नितीन सावंत यांनी केले आहे.