नवनिर्वाचित तालुकाप्रमुख घराघरांत शिवसेना पोहोचवतील

जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांना विश्‍वास
। पनवेल । प्रतिनिधी ।

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच कट्टर शिवसैनिक विश्‍वास पेटकर यांची पनवेल तालुकाप्रमुखपदी नियुक्ती केली असून, ते आता जोमाने काम करून शिवसेना घराघरात पोहोचवतील, असा ठाम विश्‍वास जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी त्यांचा विशेष सत्कार करताना व्यक्त केला. विश्‍वास पेटकर हे प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक असून, त्यांना पक्षाकडून दिलेल्या प्रत्येक जबाबदार्‍या यशस्वी पार पडल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या शिवसेनेच्या माध्यमातून कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून, त्यांना तालुकाप्रमुख ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे, यातसुद्धा ते यशस्वी होऊन तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवतील, असा मला ठाम विश्‍वास असल्याचे मत बबन पाटील यांनी त्यांचा विशेष सत्कार करताना व्यक्त केला. त्याच प्रमाणे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, शिवसेना स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण आदींसह अनेक शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version