शिवकालीन तलावाला मिळणार नवी झळाळी

। माणगाव । प्रतिनिधी ।
निजामपूर येथील शिवकालीन तलावाच्या विकासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 5 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या शिवकालीन तलावाला नवी झळाळी मिळणार आहे
निजामपूर येथील प्राचीन शिवकालीन तलाव वर्षानुवर्षे विकसापासून दुर्लक्षित राहिला होता. या सुशोभिकरणासाठी पुरेसा निधी शासनाकडून मिळत नव्हता. याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे प्रश्‍न लावून धरला. मात्र सुशोभिकरण झाले नाही. शिवसेनेचे निजामपूर विभाग प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य प्रसाद गुरव यांनी खा. सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे हा प्रश्‍न मांडून निजामपूर येथील राष्ट्रवादी कॉ. पक्षाच्या जाहीर मेळाव्यात राष्ट्रवादी कॉ. पक्षात प्रवेश केला होता. खा. तटकरे यांनी गुरव यांना दिलेला शब्द पाळत त्यांनी तत्काळ पाठपुरावा करीत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 5 कोटी रुपये या कामासाठी मंजूर करून घेतले. पैकी 2 कोटी रुपये सुशोभिकरणाचे कामाचे मंजुरीचे पत्र पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महाड, पोलादपूर, माणगाव राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांच्या उपस्थितीत सरपंच राजाभाऊ रणपिसे, प्रसाद गुरव यांच्याकडे दिल्याने निजामपूरातील नागरिकांनी एकच जल्लोष केला.

त्याचबरोबर निजामपूर ग्रा. पं. पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी रुपये जॅकवेल व फिल्ट्रेशन प्लँन्टसाठी मंजूर केले. तसेच रुग्णवाहिका तत्काळ दिली. खा. तटकरे कुटुंबीयच विकास करू शकतात. असे सांगत निजामपुर शिवकालीन तलाव सुशोभिकरणाचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल प्रसाद गुरव व सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी तटकरे कुटुंबियांचे जाहीर आभार मानले.

Exit mobile version