| पेण | प्रतिनिधी |
जय मल्हार मित्र मंडळ ग्रामस्थ अंतोरे अयोजित रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने आमंत्रीत 32 कबड्डी संघाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पद शिवाई बांधण यांनी मिळवले आहे.
अंतोरे येथे रायगड जिल्हयातील 32 संघाना आमंत्रीत करण्यात आले होते. उशिरा सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम लढत पहाटे 4 वाजता सुरू झाली. अंतिम चार संघामध्ये शिवाई बांधण, नवतरुण कारावी, जय हनुमान चरी आणि बाळनंद कासू यांनी धडक मारली होती. अॅड. मंगेश नेने व प्रदिप वर्तक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेला मा. आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरिओम), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, मा. नगरसेवक समिर म्हात्रे, दिव सरपंच विवेक म्हात्रे, प्रदिप वर्तक, हिराजी चौगुले, मिलींद पाटील, आनंत पाटील यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.
पहिला सेमिफायनलचा सामना नवतरुण कारावी विरुध्द बाळनंद कासू यांच्यात रंगला. नवतरुण कारावी हा संघ विजय झाला. तर दुसर्या सेमिफायनलच्या स्पर्धेमध्ये शिवाई बांधण विरुध्द जय हनुमान चरी यांच्या मध्ये सामना रंगला, हा सामना देखील चुरशीचा झाला. मात्र शिवाई बांधण यांनी नाममात्र एका गुणांनी चरीचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना रंगतदार होईल असे वाटत होते, परंतु शिवाई बांधणच्या राज जंगमने आपल्या चढाईच्या जोरावर नवतरुण कारावीच्या संघाला पराभवाच्या खाईत ढकले
स्पर्धेचा निकाल
या स्पर्धेमध्ये शिवाई बांधण प्रथम क्रमांक, नवतरुण कारावी द्वितीय क्रमांक, जय हनुमान चरी तृतीय क्रमांक, बाळनंद कासू चतुर्थ क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्ध्येतील उत्कृष्ट खेळाडू राज जंगम याला सायकल देउन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट चढाई मिथुन मोकल याला कुलर देउन सन्मानिम करण्यात आले. उत्कृष्ट पकड ओमकार तांडेल याला स्मार्ट वॉच देण्यात आले. तर पब्लीक हिरो बिपीन थळे याला आकर्षक ट्रॉफी देउन सन्मान करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ अंतोरा सरपंच अमित पाटील, नगरसेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे, पांडूरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.