। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिराच्या जवळपास एक अज्ञात व्यक्ती आज सोमवार दि.०१/०१/२०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत येथे आलेल्या भाविकाच्या निदर्शनास आले आहे. सदरील व्यक्तीच्या नाकावाटे रक्त येत असून तो बेशुद्धावस्थेत आहे, त्याच्यासोबत कोणी नाही असे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्या अज्ञात व्यक्तीला कनकेश्वर डोंगरावरून खाली आणण्यासाठी मदतीची गरज आहे, त्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास होणार धोका टळेल, तसेच सदरील व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास तिथे उपस्थित असलेले भाविक श्री.मंगेश राऊत -9922948188 ह्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.