| आगरदांडा | प्रतिनिधी |
350 वर्षांपुर्वी उन्मत्त झालेल्या सिद्दीला नामोहरम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यासह जिगरबाज मावळ्यांनी मुरुड समुद्रकिनारा पासून पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. परंतु, पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. समुद्राच्या लाटेने या किल्ल्याच्या भिंतीची पडझड सुरू आहे. याकिल्ल्याची अवस्था बिकट झाली असून महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना या किल्ल्याकडे लक्ष देता येत नाही. जतन व संवर्धन करिता निधी ही उपलब्ध करून दिली जात नाही. समुद्रात काही अंतरावर असणाऱ्या जंजिरा किल्ला संवर्धन आणि जतन करण्या करिता निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून दर वर्षी या किल्ल्याची पुरातत्व विभागाकडुन स्वच्छता व जतन संवर्धन केले जाते. परंतु, शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवरायांचा पद्मदुर्ग किल्ला दुर्लक्षित
