शिवप्रेमी मित्र मंडळाच्या शिवज्योतीचे मुरुडमध्ये स्वागत

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड खारआंबोळी येथील शिवप्रेमी मित्र मंडळाचे 200 युवक शिवजयंती निमित्त सलग 7 वर्ष शिवरायांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन शिवरायांचा आशीर्वाद घेऊन प्रतिमेसमोर ज्योत प्रज्वलित करून मुरुडकडे निघाले पहाटे 2 वाजता निघून मुरुड शहरात 11 वाजता पोहचले. शिवज्योतीचे मुरुडकरांनी उत्साहात स्वागत केले. येणार्‍या शिवप्रेमींना पाणी सरबत देऊन पुन्हा चालण्यासाठी सज्ज करत होते. प्रत्येक 3 किमीनंतर ज्योत घेणारे बदलत असल्याने प्रवास सुखाचा पण खडतर झाला. परंतु, शिवरायांवरचे प्रेम असल्याने 7 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. 200 युवकांसह 10 महिला शिवज्योती सोबत असल्याने या मंडळाचे कौतुक होत आहे. ही शिवज्योत आणण्यासाठी मंडळाचे चिंतामणी बेडेकर, गणेश गोसावी, संकेत म्हात्रे, अक्षय बेडेकर, दीपेश पेरवे, मंगेश खंडागळे आदी शिवप्रेमींचा सहभाग होता. खारआंबोली हे गाव शौर्य खेळात कायम पुढे असते. तेथील युवावर्ग भजन कीर्तन आणि वारकरी संप्रदायातील असून खरे शिवप्रेमी आहेत. शिवज्योत मुरुड शहरात आल्यावर बाजारात भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालिकेत शिवरायांच्या प्रतिमेला हार घालून गावात जुनी पेठ, अलंकापुरी येथील शिवप्रतिमेला नमन करून ज्योत मूळगावी म्हणजे खारआंबोली येथे नेण्यात आली.

Exit mobile version