महानवाडीत शिवसेनेला भगदाड

अनेक काँग्रेससह शिवसैनिकांचा शेकापक्षात प्रवेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील महानवाडी येथील काँग्रेससह शिवसैनिकांनी शेतकरी कामगार पक्षात जाहिर पक्ष प्रवेश केला. शिवसेनेचे नरेश भांडविलकर आणि सहकारी तसेच काँग्रेसचे नंदकुमार चिखले आणि सहकारी त्याचप्रमाणे युवा मंडळ महानवाडी यांचा यात समावेश आहे. या सर्वांचे पक्षामध्ये शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य सुभाष वागळे, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटनेचे तालुका चिटणीस विक्रांत वार्डे, अरुण भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, ग्लोबल वार्मिंग माणसाने अतिप्रगती केली असल्यामुळे अवकाळी पाऊस, चक्रीवादळ असे अनेक संकटे मानवावर येत आहेत. आपण अशा कठिण काळात शेकापक्ष आणि पुरोगामी युवक संघटनेची मुले जनतेच्या पाठीशी ठाम उभे असतील. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे झाले पाहिजेत. त्यातून शेतकर्‍यांना योग्य ती भरघोस अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी शेकापक्षाचे
आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेकापक्षाचे कार्यरत असणार्‍या विविध सेल आरोग्य, वकील, शेतकरी पुरोगामी या संघटनांच्या माध्यमातून असली काम खरे काम गरजेचे काम त्या वेळी करण्याचे काम होत असते. जनतेच्या संकट काळात पोलिस ठाण्यापर्यंत शेकापक्ष धावतो. हे उपकार नाहीत हे आमचे कर्तव्य आहे कधीच अपेक्षा नाही ठेवली आणी यापुढे देखील अशी अपेक्षा ठेवणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे पण मनात गैरसमज असता कामा नये.
तालुक्याची परिस्थिती काय झाली आहे, तालुक्यातला विरोधक खोटारडा आहे, खूप खोटे बोलतो. 15 हजार नोकर्‍या देणार सांगून देत नाही, रस्ता स्वतःच्या पैशातून करणार म्हणून सांगून करीत नाही हे चुकीचे आहे. विरोधक कशाला झाला पाहिजे तर तात्वीक विचारांवर विरोध झाला पाहिजे. विरोधक असायलाच हवा. पण आजचा आपला विरोधक मुलांना दारु प्यायला शिकवतो हे मला मान्य नाही, आम्ही हे करणार नाही. आमची नाळ मातीशी आहे. एका मुलाच्या व्यसनाने घर उध्वस्त होईल. निवडणूका येतील, जातील संघटनेची ताकद आहे व्यक्तीची ताकद नाही. तालुक्यात विरोधकांच्या संघटनेचे अस्तित्व नाही. वैचारिक पोकळी आहे, त्यांना विचार नाही. याउलट शेकापक्ष एक विचार घेउन जातो. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांचा विचार घेऊन चालणार शेकाप पक्ष जातो तेंव्हा सर्वसामान्य गोरगरीबांचा काम करतो, न्याय देतो. असेही त्यांनी यावेळी नमुद केले. तर तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये लाल बावटयाची शेतकरी कामगार पक्षाची ऊर्जा आहे आणि पाठिवर जयंत पाटील यांचा हात ही ताकद आहे. कोरोना काळात शेकापक्ष प्रत्येक माणसापर्यंत पोहचत होता. शेकापक्ष मदतीला येतो हे कर्तव्य म्हणून त्यामुळे उपकाराची भावना कोणीही ठेवू नका. शेकापक्षाच्या शिबीरातून कार्यकर्ता घडवला जातो. शेकापक्षाच्या संस्कारातून हे सर्व शक्य होते. युवा पिढीचे चांगले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करु. असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version