शिवसेना महिला आघाडी संघटीकापदी सुजाता पाटील

। रसायनी । वार्ताहर ।

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जिल्हा संपर्क नेत्या किशोरी पेडणेकर व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटिका ममता पाटील यांनी उरण तालुक्याच्या जसखार गावातील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या सुजाता संतोष पाटील यांची नवघर विभागासाठी महिला आघाडी उपतालुका संघटीकापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांनी सुजाता पाटील यांचे अभिनंदन केले. उरण तालुक्यातील नवघर विभागात महिला आघाडी बांधणीसाठी मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, केगाव विभाग प्रमुख एस.के.पुरो, माजी शहर संघटक महेश वर्तक, उरण शहर संपर्क संघटिका वंदना पवार, वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे, अल्पसंख्यांक सेलच्या उरण तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शाखा संघटिका हसीमा सरदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version