| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी पनवेल यांच्या वतीने व उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पनवेल पोलीस उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विधानसभा संघटिका सुजाता कदम, कळंबोली शहर शहरसंपर्क संघटिका समीक्षा खांदा कॉलनी शहर संपर्क संघटिका अर्चना शिरसागर, पनवेल शहर संघटिक अर्चना कुलकर्णी कामोठे शहर संघटिका संगीता राऊत, नवीन पनवेल शहर संघटिका मालती पिंगळे, खांदाकॉलनी शहर संघटिका सानिका मोरे, कळंबोली शहर संघटिका ज्योती मोहिते, खांदा कॉलनी उपशहर संघटिका स्मिता घाडगे, पनवेल उपशहरसंघटिका उज्वला गावडे, कामोठे उपशहर संघटिका सुरेखा जाधव, कळंबोली उपेशशहर संघटिका निशा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.







